#CWC19 : न्यूझीलंडचे इंग्लंडसमोर विजयासाठी 242 धावांचे लक्ष्य

लंडन – क्रिस वोक्स आणि लियाम प्लंकेट यांच्या धमाकेदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 8 बाद 241 धावांवर रोखले आहे. त्यामुळे इंग्लंड संघाला विश्वविजेतेपद मिळविण्यासाठी 50 षटकांत 242 धावांची आवश्यकता असणार आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टील पुन्हा एकदा अपयशी ठरला, तो केवळ 19 धावां काढून बाद झाला. त्यानंतर हेनरी निकोल्स आणि केन विलियमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. न्यूझीलंडची धावसंख्या 103 असताना लियाम प्लंकेट याने केन विलियमसनला 30 धावांवर झेलबाद करत माघारी धाडले. त्यानंतर न्यूझीलंड संघाच्या ठराविक अंतरावर विकेट पडत गेल्यामुळे त्यांना 50 षटकांत 8 बाद 241 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. हेनरी निकोल्सने सर्वाधिक 55 तर टाँम लाथम याने 47 धावा केल्या.

इंग्लंडकडून क्रिस वोक्स याने 9 षटकांत 37 धावा देत 3 गडी बाद केले तर लियाम प्लंकेटने दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी करत 10 षटकांत 42 धावा देत 3 गडी बाद केले. तर जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड याने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.