बॉलीवूड करोनाच्या कचाट्यात! विकी कौशलसह ‘ही’ अभिनेत्री करोना पॉझिटिव्ह

मुंबई – बॉलिवूडचे अनेक दिग्गज करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अक्षय कुमार, गोविंदा पाठोपाठ आता विकी कौशल आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनाही करोनाची लागण झाली. विकी आणि भूमीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. 

संपूर्ण काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन असून माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या  त्यांनी स्वत:ची करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या, अशी विनंती विकीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

तर, भूमीने म्हंटले कि, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून काही सौम्य लक्षण दिसून येत आहेत पण मी ठिक आहे. सध्या मी विलगीकरणात असून डॉक्टर आणि वैद्यकिय जाणकारांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे. जर तुम्ही माझ्या संपर्कात आला असाल तर तातडीने करोना चाचणी करून घ्या.

तसेच, सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या. सर्व काळजी घेऊनही मला करोनाची लागण झाली. मास्क घाला. सॅनिटाइझरचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा आणि सामाजिक भान राखा, असे आवाहन भूमीने नागरिकांना केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

दरम्यान, संजय लीला भंसाळी, आलिया भट्ट, रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, क्रिती सेनन यांच्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.