Bollwood : अभिनेता टायगर श्रॉफची कारकीर्द डळमळीत सुरू झालीये. बॉक्स ऑफिसवर गणपत चांगली कमाई करू शकला नाही. याआधीही टायगरच्या चित्रपटांची अवस्था वाईट होती. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही, दिशा पटानीपासून विभक्त झाल्यानंतर त्याचे चाहते दुखावले आहे.
अशात टायगर श्रॉफला त्याच्या माजी मैत्रिणीसोबत पडद्यावर दिसण्याचा एकमेव मार्ग आता उरला आहे का? निदान निर्माते तरी या मार्गाने पाहत आहेत. याच कारणामुळे आता दिशाला बॉक्स ऑफिसवर टायगरला सपोर्ट करण्यासाठी परत बोलावण्यात आले आहे.
गणपतच्या सुपर फ्लॉपनंतर टायगरच्या टीमने डॅमेज मॅनेजमेंट सुरू केल्याची बातमी आहे. गणपतनंतर टायगरचा पुढचा चित्रपट ‘हिरो नंबर 1’च्या कास्टिंगमध्ये मोठा बदल होत असून, त्यात दिशा पटानीच्या एन्ट्रीची बातमी मीडियात आहे. तर सारा अली खानला पहिल्या चित्रपटात कास्ट करण्यात आले होते.
टायगर श्रॉफसोबत दिशाची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच चित्रपटगृहात येतील, अशी निर्मात्यांना पूर्ण आशा आहे. गेल्या वर्षी त्यांच्या ब्रेकअपनंतर, हे दोघे आता जगन शक्तीच्या हिरो नंबर 1 मध्ये एकत्र दिसणार आहे. टायगरचा सोलो हिरो म्हणून शेवटचा सुपरहिट चित्रपट 2018 चा बागी 2 होता. ज्यामध्ये दिशा त्याची हिरोईन होती. जगन शक्ती हे मिशन मंगल या चित्रपटासाठी ओळखले जातात.
अभिनेत्री सारा अली खानच्या जागी दिशा पटानीला हिरो नंबर 1 मध्ये कास्ट करण्यात आले आहे. साराचे डेट शेड्यूल या प्रोजेक्टशी जुळत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ती पूजा एंटरटेनमेंटच्या या चित्रपटातून बाहेर पडली आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांची जोडी म्हणून खूप चाहते आहेत. अशात दिशाच्या येण्याने चित्रपटाला फायदा होईल.