मुंबई – अभिनेता बॉबी देओल आजकाल त्याच्या फिटनेसमुळे चांगलाच चर्चेत असतो. मग कधी तो एअरपोर्टवर फक्त बनियनमध्ये दिसतो तर कधी मीडियावाले त्याला डोले शोले म्हणत पोज द्यायला लावतात. बॉबी देओलच्या नावे गेल्या पाच सात वर्षांमध्ये मोठे हिट सिनेमे नसले तरी बॉबीने बिग बजेट सिनेमे दिले आहेत. याच बिग बजेट सिनेमांसाठी बॉबी नेहमीच स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. सध्या बॉबीचा जिम मधील एक वर्कआऊट व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
आश्रम सिरीजीच्या दोन्हही सिजनमध्ये बॉबी देओलने कमालीचा अभिनय केला आहे. याच सिरीजमुळे बॉबीला बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळाली. बॉबी लवकरच ‘अॅनिमल’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. यासाठी बॉबी जिममध्ये मेहनत करताना दिसून आला. बॉबी देओलचा हा जिम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या नवीन भूमिकेसाठी बॉडीशेपवर मेहनत घेतोय.
प्रज्वल शेट्टीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बॉबी देओल जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. एकामागून एक नवीन प्रकारे कसरत करणाऱ्या बॉबीवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. चाहत्यांना बॉबीचा हा फिटनेस फंडा चांगलाच आवडला आहे. यावेळी तो पूर्ण वेळ देऊन आपल्या शरीराकडे लक्ष देताना दिसत आहे. ५४ वर्षांचा असूनही जिममध्ये बॉबीची मेहनत पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, वो.. हो खतरनाक तर दुसऱ्या एकाने कमेंट करत थेट मलाही फिटनेसबाबत टिप्स द्या ? अशी मागणी केली आहे. बॉबी देओल सध्या रणबीर कपूर स्टारर ‘एनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याआधी तो आश्रम सिरीजमध्ये दिसला होता.