मुंबई – संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलची लोकप्रियता दिवसेंदिवस आणखीच वाढत आहे. सुरुवातील अश्लील हावभाव करून नाचल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. याप्रकरणी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर तिने याप्रकरणी सर्वांची जाहीरपणे माफी देखील मागितली. आजही तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या यशानंतर आता गौतमी ‘घुंगरू’ चित्रपटात झळकणार आहे.
काही दिवसांपूर्वीच तिने चित्रपटात काम करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या गौतमी पाटील एका लावणी कलावंताची भूमिका साकारत आहे. आयुष्यातील काही घटनांमुळे ती नायकाच्या प्रेमात पडल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यात राजकारण, थरारदृश्य आणि गौतमी पाटीलचा डान्स, कातील अदा पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
संदीप डांगे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गौतमी पाटीलसह काही नवीन कलाकार चित्रपटात दिसणार आहे. तसेच अभिनेत्री उषा चव्हाण देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, ‘घुंगरू’ चित्रपटाचा टीझर सध्या अनेकांच्या पसंतीत पडत आहे. हा टीझर पाहून अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.