Bobby Deol : अभिनेता रणवीर कपूरचा ‘अॅनिमल’ (Animal) चित्रपटात सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींची कमाई केली आहे. रणवीरसह अभिनेता बॉबी देओलची (Bobby Deol) देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका अत्यंत उत्तमरित्या निभावली आहे. बॉबी देओल यांच्या भूमिकेचे कौतुक होत असताना त्यांच्या आईने या चित्रपटाबाबत कशी रिअॅक्शन दिली याबाबतही बॉबी देओलने एका मुलाखतीत सांगितले आहे.
बॉबी देओल यांची आई प्रकाश कौर यांनी अॅनिमल हा चित्रपट पाहिल्यानंतर अशा चित्रपटात काम करु नको, मला पाहवत नसल्याचे म्हंटले आहे. याबाबत सांगताना बॉबी देओल म्हणाला, “माझी आई चित्रपटातील माझ्या भूमिकेच्या मृत्यूचा सीन पाहू शकली नाही. ती म्हणाली, ‘अशा चित्रपटात काम करु नको, मला पाहवत नाही’. त्यानंतर मी तिला म्हणालो, हे बघ, मी तुझ्यासमोर उभा आहे, मी फक्त एक भूमिका साकारली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तिला खूप आनंद झाला.” आश्रम वेब सीरिज रिलीज झाली होती तेव्हाही असेच घडल्याचेही यावेळी बॉबी देओलने सांगितले.
दरम्यान, अॅनिमल या चित्रपटाचं संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. या चित्रपटात बॉबी देओल, रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे मराठमोळे अभिनेते उपेंद्र लिमये यांनी देखील एका सीनमध्ये काम केलं आहे. अॅनिमल या चित्रपटाची सॅम बहादुर या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. मात्र दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.