PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री एल मुरुगन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोंगल सण साजरा केला. कामराज लेन येथील मुरुगन यांच्या शासकीय निवासस्थानी पोंगल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांसोबत तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजनही उपस्थित होत्या. पोंगलमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी पूर्णपणे दक्षिण भारतीय पारंपारिक पोशाखात दिसले.
सध्या नरेंद्र मोदी यांच्या साऊथ इंडियन लुकची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. मोदींचे विविध वेशातील पोशाखांची नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाले आहे. त्यांनी ब्लेजर आणि लुंगी परिधान केली होती. सध्या त्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोंगल सणाच्या पूजेदरम्यान मोदींनी गायीचे पूजन केले. तिला नैवेद्य खाऊ घातला आणि फुलांचा हारही घालण्यात आला. पूजेनंतर पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधितही केले. पंतप्रधानांनी वनक्कम म्हणत लोकांना शुभेच्छा दिल्या आणि पोंगलच्या शुभेच्छाही दिल्या.
#WATCH | Prime Minister Narendra Modi takes part in the #Pongal celebrations at the residence of MoS L Murugan in Delhi.
Puducherry Lt Governor and Telangana Governor Tamilisai Soundararajan also present here. pic.twitter.com/rmXtsKG0Vw
— ANI (@ANI) January 14, 2024
आपल्या संबोधनात पंतप्रधान म्हणाले की, पोंगल सणाच्या पवित्र दिवशी तमिळनाडूतील प्रत्येक घरातून पोंगलची धारा वाहते. त्याचप्रमाणे लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान सतत येवो. कुटूंबासोबत सण साजरा करत आहे.” पुढे शेतकऱ्यांबाबत ते म्हणाले, “शेतकरी हे आपले अन्नदाता आहेत. त्यामुळेच भारतातील प्रत्येक सण हा गाव, शेतकरी आणि पिकांशी संबंधित असतो. पंतप्रधान म्हणाले की, 3 कोटी शेतकरी अन्नाशी जोडलेले आहेत, तर देशातील अनेक तरुण जेवणाशी संबंधित स्टार्टअप सुरू करत आहेत. गेल्या वेळी आम्ही चर्चा केली होती की बाजरीचा तामिळ संस्कृतीशी संबंध आहे. देशात आणि जगात याबद्दल जागरुकता आली आहे, अनेक स्टार्टअप सुरू झाले आहेत.”