मुंबई – शिवसेनेची बहुप्रतीक्षीत पत्रकार परिषद आज मुंबईतील शिवसेना भवन येथे पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजपवर अनेक आरोप केले. आता भाजपकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.
संजय राऊत यांनी सोमवारीच भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये जातील, असा दावा केला होता. त्यामुळे शिवसेना काय बॉम्ब फोडणार याची सर्वांना प्रतीक्षा होती. त्यानुसार संजय राऊत यांनी अनेक आरोप केले.
यावर भाजपकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, योग्यवेळी आपण उत्तर देऊ असं म्हटलं आहे.
दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली. शिवसेनेची पत्रकार परिषद म्हणजे फुसक्याच्या आधीच जो फटाका असतो, तशी होती, अस म्हणत दरेकरांनी खिल्ली उडवली.