Solapur Lok Sabha| देशभरातील लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र अद्याप महायुतीच्या जागा वाटपबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. तर काही दिवसांपूर्वीच भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
मात्र उर्वरित 28 जागांचे उमेदवार अजून जाहीर झालेली नसल्याने विविध उमेदवारांची नावे समोर येत आहे. यातच आता भाजपकडून आमदार राम सातपुते यांची सोलापूर लोकसभेसाठी निवड केले जाण्याचे निश्चित मानले जात आहे.
राम सातपुते यांना उमेदवारी देणार? Solapur Lok Sabha|
दुसरीकडे, काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचा पराभव करण्यासाठी भाजप एका तरुण आमदाराला संधी देणार असल्याचे म्हंटले जात आहे. यामुळे
भाजपकडून युवा चेहरा म्हणून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
भाजपचे आक्रमक चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष सुद्धा आहेत. माळशिरसचे आमदार असतानाही त्यांनी सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल चा प्रश्न विधानसभा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता.
सोलापुरात शिंदे विरुद्ध सातपुते लढत रंगण्याची शक्यता Solapur Lok Sabha|
तर प्रणिती शिंदे या देखील सोलापूर शहर मध्यच्या मतदारसंघात मागील तीन टर्म आमदार आहेत. त्या थेट मतदारांच्या संपर्कात राहतात. मतदारांचे प्रत्येक प्रश्न ते विधानसभेत मांडतात. महिला आणि युवकांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत तगडी लढत देण्यासाठी आमदार राम सातपुते यांचं नाव निश्चित होण्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सोलपुरात शिंदे विरुद्ध सातपुते अशी लढत होताना दिसणार आहे. दरम्यान, महायुतीचं जागावाटप येत्या 24 तासात जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
“महाराष्ट्र सरकारमधील नेते लीडर नाही तर डिलर”; तेजस्वी यादव यांची टीका