- माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थित नोंदविला निषेध
वडगाव मावळ – सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात अपयशी ठरले. या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 14) मावळ पंचायत समिती येथे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर निषेध करण्यात आला. निवेदन मावळ तहसील कार्यालयात पुरवठा अधिकारी शिवाजी जाधव यांना दिले.
महाविकास आघाडी सरकार हे मराठा समाजाला आरक्षण टिकवून ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. लाखो विद्यार्थी व बेरोजगारांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील प्रश्नांचे काहीही देणेघेणे उरलेले नाही. अशा महाआघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मावळच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष संदीप काकडे, भाजप महिला तालुकाध्यक्ष सायली बोत्रे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर आदींनी या वेळी भाषणातून जाहीर निषेध केला.
यावेळी सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्ता शेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, संघटनमंत्री किरण राक्षे, सरचिटणीस सुनील चव्हाण, गणेश धानिवले, प्रशांत ढोरे, बाबूलाल गराडे, संतोष कुंभार, विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, नितीन घोटकुले, नामदेव वारींगे, नामदेव शेडगे, सचिन भांडे, विकास लिंभोरे, देवा गायकवाड, रवींद्र विधाटे, अनंता कुडे, दत्तात्रय गाडे, सागर शिंदे, वैशाली ढोरे, अमोल भेगडे, स्वामी गायकवाड, सुनील वरघडे, कृष्णा घिसरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण यांनी केले. भाजप विद्यार्थी तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी आभार मानले.