मुंबई – ”मेरा पानी उतरतां देख किनारे पर घर मत बना लेना …. मै समंदर हु लौटकर जरूर आऊंगा …!!!” असं भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. या ट्विट सोबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही शेअर केला आहे.
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 28, 2022
दरम्यान,महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भारतीय जनता पक्षाचे लक्ष असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सरकार बनविण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबविणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी हातमिळवणी करत ‘शिंदे पॅटर्न’ भाजपा राबवण्याची शक्यता आहे. यातच भाजप नेत्यांकडूनही ट्विट आणि सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचे फोटो शेअर करत आता राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा केला जात आहे.