कोंढव्यातील व्यावसायिकाची केली १ कोटी ६४ लाखांची फसवणुक
पुणे : भागीदारीत एकत्रित व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावाने पैसे घेऊन ते प्रकल्पात न गुंतविता फसवणुक केल्या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक व भाजपनेते रत्नाकर पवार (रा. नाशिक) यांना अटक केली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नाकर पवार यांनी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर तब्बल ६ महिन्यांच्या प्रयत्नानंतर कोंढवा पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश मिळाले आहे.