पुणे – भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करण्याचे व जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यावसायिकाची पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी नाशिक येथून अटक केलेल्या बांधकाम व्यावसायिक व भाजपचा नेता रत्नाकर पवार याच्यासह आणखी एकाला न्यायालयाने 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
रत्नाकर ज्ञानदेव पवार (50, रा. नाशिक) असे भाजप नेत्याचे नाव आहे. त्यासह अशोक परशुराम अहिरे याला अटक केली. या प्रकरणात यापूर्वी चौघांना अटक केली. याबाबत मोहद्दीस महंमद फारुख बखला (36, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार करीत आहेत.