Chhattisgarh MP Rajasthan BJP Candidate List 2023: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने सोमवारी (9 ऑक्टोबर) छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशची यादी जाहीर केली.
भाजपने राजस्थानमधील 41 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर छत्तीसगडमध्ये 64 आणि मध्य प्रदेशमध्ये 57 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. छत्तीसगडसाठी भाजपची ही दुसरी आणि मध्य प्रदेशसाठी तिसरी यादी आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मध्य प्रदेशातील बुधनी येथून तिकीट देण्यात आले आहे. दतियामधून गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथून राज्यसभेचे खासदार किरोडीलाल मीना यांना तिकीट देण्यात आले आहे. खासदार भगीरथ चौधरी, बालकनाथ, नरेंद्र कुमार आणि देवजी पटेल यांनाही मैदानात उतरवण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना जयपूरमधून तिकीट देण्यात आले आहे.
राजस्थानच्या या यादीत 19 जागा अशा आहेत ज्यात भाजप कधीही जिंकू शकलेला नाही. गेल्या निवडणुकीत उर्वरित जागांवर भाजपचा पराभव झाला होता. वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय नरपत सिंह राजवी यांचे तिकीट रद्द केल्यानंतर भाजपने विद्याधर नगरमधून दिया कुमारी यांना उमेदवारी दिली आहे.
छत्तीसगडमधून 3 खासदारांना तिकीट –
छत्तीसगडमधून 3 खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. या यादीत सर्वात धक्कादायक नाव आहे ते सजा मधील ईश्वर साहू यांचे. दोन समाजातील वादातून ईश्वर साहू यांच्या मुलाची हत्या करण्यात आली. रायगडमधून माजी जिल्हाधिकारी ओपी चौधरी यांना तिकीट मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष अरुण साव हे लोर्मीमधून निवडणूक लढवणार आहेत. माजी मुख्यमंत्री रमण सिंह राजनांदगावमधून निवडणूक लढवणार आहेत.
सविस्तर यादी पाहा –
राजस्थानची यादी –
मध्य प्रदेशची यादी –