मुंंबई – अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे आई-वडील झाल्यापासून नेहमीच चर्चेत असतात. बिपाशा आणि करणच्या लग्नाच्या सहा वर्षानंतर हे जोडपे पालक बनले आहे. त्यांच्या मुलीचे नाव देवी आहे. अनेकदा देवीचे व्हिडिओ बिपाशा सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने देवीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे तिचे कौतुक केले जात आहे.
बिपाशाने तिच्या लेकीचे नाव जितके आध्यामिक ठेवले आहे तितकीच ती मुलीला योग्य असे संस्कार देखील देण्याचा प्रयत्न करते. नुकतेच बिपाशाने देवीचा झोपतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये देवीचे वडिल करण सिंग ग्रोव्हर हनुमान चालीसा तिला ऐकवताना दिसत आहे. देवी देखील शांतपणे हनुमान चालीसा ऐकत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
बिपाशा बासूने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की “बेडटाइम विथ पापा, मामा आणि देवी” सध्या देवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी आणि कलाकार तिचं कौतुक करत आहेत. तिच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत बिपाशाच्या आणि करणने दिलेल्या संस्काराचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिपाशाने मुलगी देवी हिच्या हृदयात दोन छिद्रे होती. त्यामुळे ती तीन महिन्यांची असताना तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाल्याचा खुलासा केला होता.