मुंबई – देशभरातील सिनेप्रेमींचे लक्ष वेधू घेणारा अभिनेता निखिल सिद्धार्थ दिग्दर्शक भरत कृष्णमाचारी यांच्यासोबतचा ‘स्वयंभू’ चित्रपट गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आले. आता या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे प्री-लूक पोस्टर रिलीज झाले होते, टागोर मधु प्रस्तुत स्वयंभू, भरत कृष्णमाचारी दिग्दर्शित आणि भुवन आणि श्रीकर यांनी पिक्सेल स्टुडिओज बॅनरखाली निर्मित आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. स्वयंभू म्हणजे स्वतः जन्मलेला किंवा स्वतःच्या मर्जीने बनलेला. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये निखिलला रणांगणातील योद्धा म्हणून पाहिले जाऊ शकते. या पोस्टरमध्ये लांब केस आणि चेहऱ्यावर हसू घेऊन निखिल घोड्यावर स्वार होतो. त्याच्या एका हातात भाला आणि दुसऱ्या हातात ढाल आहे.
मनोज परमहंस यांचे सिनेमॅटोग्राफी, रवी बसरूर यांचे संगीत आणि वासुदेव मुनेपागरी यांचे संवाद असलेला हा निखिलच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट असल्याचे म्हटले जाते. याशिवाय अभिनेता निखिलकडे स्पाय हा चित्रपट आहे, जो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्यावर केंद्रित आहे. निखिलच्या विरुद्ध महिला लीड म्हणून संयुक्ता मेननचा समावेश ही अपेक्षा वाढवणारी आहे. या दोघांची केमेट्री पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. प्रख्यात सिनेमॅटोग्राफर मनोज परमहंस करणार आहे. संगीताचा स्कोअर प्रतिभावान रवी बसरूरकडे सोपवण्यात आला आहे