नवी दिल्ली – बिल्कीस बानो प्रकरणातील आव्हान याचिकेवरील अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीदरम्यान सामुहिक बलात्कार आणि कुटुंबियांच्या हत्या प्रकरणातील 11 दोषींना मुक्त करण्याविरोधातील ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्व 11 दोषींना गुजरात सरकारने माफी दिली आणि गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी त्यांची सुटका केली आहे.
या संदर्भातील युक्तीवाद पूर्ण झाला असून सर्व दोषींना वर्तमानपत्राच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल 7 ऑगस्ट रोजी सुनावण्यात येईल, असे न्या. बी.व्ही.नागारत्न आणि न्या. हज्जल भुयन यांच्या पिठाने सांगितले. सर्व दोषींपर्यंत नोटीस पोचवण्यात यावी.
जर घराला कुलुप असल्यामुळे किंवा फोन बंद असल्यामुळे कोणापर्यंत नोटीस पोचवता आली नाही, तर स्थानिक गुजराती आणि इंग्रजी वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 9 मे रोजीच्या सुनावणीच्यावेळी दिले होते.