मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला सतत कोणत्या-न-कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर करिअरचा आलेख कायम उंचावर ठेवण्यात यश मिळविले आहे. त्याचवेळी उर्वशी रौटेलाविषयी एक बातमी येत आहे, जी ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतील.
View this post on Instagram
नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींना मोठ्या फंक्शन्समध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळते. या कामासाठी त्यांना चांगलेच मानधन मिळत असते. आता उर्वशीही असेच काही करताना दिसत आहे.
View this post on Instagram
रिपोर्टसनुसार 2021 च्या सुरुवातीला उर्वशी प्लाझा हॉटेल वर्सास येथे 15 मिनिटांचा परफॉर्मन्स केला आहे. असे सांगितले जात आहे की केवळ 15 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी उर्वशी रौटेलाने तब्बल 4 कोटी रुपयांचे मानधन स्वीकारले आहे.
View this post on Instagram
अशा प्रकारे उर्वशीने धमाक्यात नववर्षाची सुरुवात केली आहे. बॉलीवूड अभिनेत्री अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी केवळ 25 ते 50 लाख रुपये घेतात, तर उर्वशीने एका कार्यक्रमासाठी कित्येक पटीने अधिक शुल्क आकारले आहे. उर्वशी रौटेलाने 2013 साली चित्रपटसृष्टीत पर्दापण केले होते.
View this post on Instagram
“सिंह साहब द ग्रेट’मध्ये सनी देओलसोबत ती झळकली होती. त्यानंतर तिने “भाग जॉनी’, “सनम रे’, “ग्रेट ग्रांट मस्ती’, “काबिल’, “हेट स्टोरी 4′ आणि “पागलपंती’मध्ये निर्णायक भूमिका साकारली आहे. तसेच दोन वेबसिरीजमध्येही तिने काम केले आहे.
View this post on Instagram