Bihar Politics – बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रीय जनता दल व काँग्रेससोबतची आघाडी तोडून पुन्हा एकदा भाजपसोबत घरोबा करण्याच्या नितीश कुमार यांच्या हालचाली वेगाने सुरु आहेत.
पक्ष नेतृत्वाच्या आदेशानंतर भाजप नेते व आमदार नितीश कुमार यांचे पुन्हा एकदा युतीमध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नितीश कुमार यांच्या आगमनाला उघड उघड विरोध करण्यात येत नसला तरी काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. ( Bihar Politics )
पक्षाचे खासदार छेदी पासवान यांनी नितीश कुमार यांच्याबाबत केलेलं भाष्य हेच अधोरेखित करत आहे. पासवान यांना, नितीश कुमार यांच्याबाबत विचारले असता त्यांनी, ‘पदासाठी नितीश कुमार कुठेही जाऊ शकतात. पदासाठीच ते भाजपसोबत येत आहेत’ असा घणाघात केला आहे.
बिहारमधील राजकीय उलथापाथीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान छेदी पासवान यांना याबाबत विचारण्यात आले होते.
‘नितीश कुमार यांच्या येण्याने पक्षाचे नेते खुश असतील, तर आम्ही देखील खुश आहोत’ असं म्हणत त्यांनी हा पक्षनेतृत्वाने लादलेला निर्णय असल्याचेच सुचवले आहे.
#WATCH | Patna, Bihar: BJP MP Chhedi Paswan says, “…..I had said earlier also that Nitish Kumar can go anywhere for the post. He is coming for the post and that is why this meeting is taking place. If my party leaders are satisfied then we are also satisfied.”#Biharpoltics pic.twitter.com/8Y1dW1aeFU
— ANI (@ANI) January 27, 2024
राजदची बैठक | Bihar Politics
नितीश कुमार बिहारमध्ये मोठी उलथापालथ करण्याच्या तयारीत असल्याने सर्व राजकीय पक्ष अलर्ट मोडवर आहेत. बिहार विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राजदने देखील आपल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीमध्ये पक्षाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार लालू प्रसाद यादव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
…म्हणून नितीश कुमार इंडिया आघाडी सोडतायेत – केंद्रीय मंत्र्याने सांगितलं कारण
नितीश कुमार तर मोहरा, खरा खेळ तेजस्वी खेळणार? बिहारच्या राजकारणात भूकंप…