Bihar Political Update – बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. नितीश कुमार आपला पक्ष जनता दल युनायटेडसह भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. याबाबतच्या हालचाली सध्या बिहारमध्ये वेगाने सुरु आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नितीश कुमार यांच्यासारखा नेता इंडिया आघाडी सोडून आपल्यासोबत येत असल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अशातच, नितीश कुमार यांच्या ‘एनडीए’मधील वापसीच्या चर्चांबाबत भाजप नेते व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वक्तव्य केलं आहे. इंडिया आघाडी अनैसर्गिक असून जे काही अनैसर्गिक असतं ते फार काळ टिकत नाही, असं वक्तव्य जोशी यांनी केलं आहे.
इंडिया आघाडीमध्ये अनेक भ्रष्टाचारी पक्ष आहेत, त्या भ्रष्टाचारी पक्षांसोबत नितीश कुमार यांचं जुळलं नाही. त्यामुळे नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा असे जोशी म्हणाले.
#WATCH | On INDIA alliance and Bihar political situation, Union Minister Pralhad Joshi says, ” This alliance is unnatural…something that is unnatural can’t survive long. So, automatically this unnatural alliance will have a natural death…whatever is happening in Bihar, we… pic.twitter.com/4UsmxRU6ui
— ANI (@ANI) January 27, 2024
भाजप ‘ऍक्शन’ मोडवर, काँग्रेस अलर्ट
दरम्यान, भाजपने पक्षाचे बिहार निरीक्षक विनोद तावडे यांना पाटण्यात धाडले असून नितीश कुमार यांच्या एनडीएतील वापसीच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत.
बिहारमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस देखील अलर्ट झाली असून छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पक्षाचे बिहार निरीक्षक म्हणून पाटण्याला पाठवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जनता दलाचीही बैठक | Bihar Political Update
सद्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात राजकीय पक्ष राष्ट्रीय जनता दलाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पक्षाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना पक्षाचे पुढील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देण्यात आल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले.
कोणाचे किती संख्याबळ? | Bihar Political Update
२४३ संख्याबळ असलेल्या बिहार विधानसभेत आरजेडीचे ७९ आमदार आहेत, त्यापाठोपाठ भाजपचे ७८, JD(U) चे ४५, काँग्रेसचे 19, CPI (M-L) चे 12, CPI(M) आणि CPI चे प्रत्येकी दोन, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर) चे चार आणि AIMIM चा एक, तसेच एक अपक्ष आमदार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
नितीश कुमार तर मोहरा, खरा खेळ तेजस्वी खेळणार? बिहारच्या राजकारणात भूकंप…
नितीश कुमार आजच पलटी मारणार? महाराष्ट्रातला बडा नेता बिहारमध्ये…