नवी दिल्ली :- बदनामीच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर काल राहुल गांधी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
लालूंची कन्या मिसा भारती यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी दोन्ही नेत्यांच्या भेटीची छायाचित्रे शेअर केली आहेत. या बैठकीला कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित होते.
राजद आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष विरोधकांच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल होण्याची शक्यता असून त्यांना पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्यासही मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी हे पुन्हा नव्या उत्साहाने राजकीय घडामोडीत सक्रिय झाले आहेत.