Bigg Boss – टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय शो ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss) मध्ये दररोज नवीन ड्रामा पहायला मिळतोय. समर्थ जुरेल (samarth jurel) याने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली. समर्थ बिग बॉसच्या घरात आल्यापासून ड्रामाला आणखी तडका मिळाला आहे.
बिग बॉसने समर्थची ओळख ही अभिनेत्री ईशा मालवीयचा (sha malviya) बॉयफ्रेंड म्हणून केली. त्यामुळे त्याच्या एण्ट्रीपासूनच बिग बॉसमध्ये नवीन ट्विस्ट आला असून, चाहते देखील चांगलेच खुश झाले आहेत. मात्र समर्थने यावेळी हद्दच पार केली आहे.
Chintu galat show me aagaya hainpic.twitter.com/VXoD6MjYaB
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 17, 2023
सध्या बिग बॉसच्या घरात ईशा मालवीया आणि समर्थ जुरेल यांचा रोमान्स सुरू आहे. त्यांच्या रोमान्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्यांचे चाळे पाहून वैतागले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये हे दोघेही विकेंडच्या वारसाठी तयार झालेले दिसत आहे.
कोणत्यातरी कारणाने ईशा नाराज असल्याचे दिसून येत असून समर्थ तिला समजावत आहेय. समजावताना समर्थने ईशाची पोटावरची साडी बाजूला घेऊन तिला किस करतो. त्यानंतर गळ्या जवळ व नंतर गालावर किस करतो. याआधी देखील हे दोघे अनेकदा रोमान्स करताना दिसले आहेत.
त्या दोघांच्या व्हिडीओवर नेटकरी भडकले असून त्यांनी ”तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात’, हे तर निब्बा निब्बी आहेत, असे कमेंट करत दोघांनाही फटकारले आहे. सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.