World Cup 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (India vs Australia Ahmedabad) तब्बल सव्वा लाख क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. सामना सुरू होण्यापूर्वी तमाम देशवासियांना भारताच्या विजेतेपदाची उत्कंठा लागली होती. एकेक फलंदाज बाद होत गेले व भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियाने रोखली (India vs Australia).
या धावांचा पाठलाग करताना ट्रेव्हीस हेडने शतक तर मार्नस लेबुशेनने अर्धशतक फटकावले व विजय खेचून आणला व त्याच क्षणी केवळ मैदानात उपस्थित असलेल्यांचीच नव्हे तर संपूर्ण देशवासियांची निराशाच झाली. 2003 सालच्या स्पर्धेचीच जणू पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियाने केली असेच आता म्हणावले लागेल.
यानंतर संघाच्या तसेच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर पराभवाचे दुःख स्पष्टपणे दिसत होते. मात्र, यादरम्यान काही सेलिब्रिटी (bollywood) सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताला प्रोत्साहन देताना दिसले. अनेक स्टार्सनी भारतीय क्रिकेटपटूंसाठी हृदयस्पर्शी संदेश लिहिला.
बॉलीवूड अभिनेत्री काजोलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर टीम इंडियाचा एक फोटो शेअर करून त्यांना प्रोत्साहन दिले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले – ‘जो हरल्यानंतर जिंकतो त्याला बाजीगर म्हणतात.. टीम इंडिया खूप चांगली खेळली.. ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन..’
त्याचवेळी अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टीनेही टीम इंडियाच्या अधिकृत पेजची पोस्ट रिपोस्ट केली, ज्यामध्ये असे लिहिले होते की, “या टीमने आम्हाला खूप आनंद दिला आहे.. संपूर्ण स्पर्धेत शानदार होतास.
अभिनेत्री नुसरत भरुचाने इन्स्टाग्रामवर चेहरा लपवत एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “आता पाहू शकत नाही..”
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतनेही टीम इंडियाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये मीराने लिहिले, ‘चॅम्पियन्स ऑफ अवर हार्ट..’
अभिनेता बोमन इराणीनेही टीम इंडियाला प्रोत्साहन दिले आणि ट्विटमध्ये लिहिले की, ‘त्यांनी आम्हाला संपूर्ण वेळ चांगला खेळ दाखवला… तो आजही शानदार खेळले..’
अभिनेता आयुष्मान खुरानानेही स्टेडियमचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यासोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ऑफिसमध्ये फक्त एक वाईट दिवस आहे @Indiancricketteam… To You guys’