नवी दिल्ली – बांगलादेशला अचानक मोठी लॉटरी लागली असून तो आता एवढा श्रीमंत होणार आहे की एका झटक्यात ते त्यांच्यावरील संपूर्ण कर्ज फेडू शकेल. पंतप्रधान शेख हसीना यांच्या सर्व चिंता आता मिटणार असून देश प्रगतीच्या मार्गावर खूप पुढे जाऊ शकतो. बांगलादेशच्या दक्षिण भागात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. यातून प्रमाणात नैसर्गिक वायू मिळणार असून त्यातून मोठे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
बांग्लादेशातील वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या दक्षिणेकडील भोला जिल्ह्यात गॅसचे साठे सापडले आहेत, ही देशासाठी खूप चांगली बातमी मानली जात आहे. ऊर्जा आणि खनिज संसाधन राज्यमंत्री नसरुल हमीद यांनी या नैसर्गिक वायू साठ्याच्या शोधाला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकारी बांगलादेश पेट्रोलियम एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन कंपनी लिमिटेडने भोला जिल्ह्यात नैसर्गिक वायूचा साठा शोधला आहे.
भोला येथील एका विहिरीतून 20 दशलक्ष घनफूटहून अधिक गॅसची शक्यता –
मंत्रालयाने म्हटले आहे की, नव्याने सापडलेल्या भोला विहिरीतून दररोज 20 दशलक्ष घनफूट पेक्षा जास्त गॅस काढण्याची शक्यता आहे. पेट्रोबांग्ला 2025 पर्यंत 46 नवीन विहिरी खोदणार आहे. देशात नैसर्गिक वायूचा शोध सुरू ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे. भोला जिल्हा राजधानी ढाकापासून सुमारे 205 किमी दक्षिणेस आहे ज्यात शेकडो अब्ज घनफूट साठा आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे क्षेत्र आहे जे सुमारे 3,403.48 चौरस किमी क्षेत्र व्यापते.