IND vs NZ – टीम इंडिया उद्यापासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्वानंतर आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील युवा सेना टी-२० मालिकेत विजय मिळवण्यास तयार आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाची कमान अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये नव्या चेहऱ्यांचा खेळ चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे शुक्रवारी एकाच दिवशी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. मात्र, या वेळापत्रकावरून क्रिकेट चाहत्यांचा गोंधळच उडालाय.
IND vs NZ T20 | पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का; युवा खेळाडू पडला मालिकेबाहेर
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी उद्या एकाच दिवशी दोन टी-२० सामने पाहायला मिळणार आहेत. कारण भारत आणि न्यूझीलंड पुरुष संघात २७ जानेवारीपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना रांचीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. तर दुसरीकडे याच दिवशी १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने भिडणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना एकाच दिवशी डबल धमाका पाहायला मिळेल.
Look who came visiting at training today in Ranchi – the great @msdhoni! 😊#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/antqqYisOh
— BCCI (@BCCI) January 26, 2023
१९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाचा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना सेनवेस पार्क, पॉचेफस्ट्रूम येथे होणार असून हा सामना दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. तर दुसरीकडे भारत विरुद्ध न्यूझीलंड या पुरुष संघांमधील पहिला टी-२० सामना JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम रांची येथे सायंकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल. भारताच्या १९ वर्षांखालील महिला संघाची आत्तापर्यंतची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. त्यामुळे त्यांना विजेतेपदापर्यंत पोहोचायला आणखी सरस खेळ करावा लागणार आहे.
The semi-final fixtures at the #U19T20WorldCup are official 👀
Who are you backing to make Sunday’s final?https://t.co/KfiE5nLVew
— ICC (@ICC) January 25, 2023
१९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकात शुक्रवारी उपांत्य फेरीतील दोन सामने खेळले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने भिडतील, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यातील विजयी संघ २९ जानेवारीला अंतिम सामन्यात खेळतील.