SBI Digital Services| जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसबीआयच्या काही सेवा आज 23 मार्च रोजी काही वेळासाठी काम करू शकणार नाहीत. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट बँकिंग, YONO Lite, YONO Business Web आणि Mobile App, YONO आणि UPI या सेवा 23 मार्चला काही तासांसाठी उपलब्ध होणार नाहीत.
SBI च्या म्हणण्यानुसार, या सेवा 23 मार्च रोजी सकाळी 01:10 ते 02:10 दरम्यान उपलब्ध नसतील. म्हणजेच एकूण 60 मिनिटांसाठी बँक ग्राहक इंटरनेट बँकिंग, YONO Lite, YONO Business Web आणि Mobile App, YONO आणि UPI वर कोणतीही क्रिया करू शकणार नाहीत. परंतु UPI Lite आणि ATM सेवा या कालावधीत उपलब्ध राहतील.
17 मार्चलाही बँक सेवा प्रभावित झाल्या होत्या. काही बँकांच्या सेवा तासभर ठप्प होत्या. त्यानंतर आज पुन्हा काही वेळासाठी या सुविधा बंद राहणार असल्याने आठवडाभरात बँक सेवा प्रभावित होण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.
काय आहे यामागचं कारण ? SBI Digital Services|
देशातील बहुतांश बँका वेळोवेळी देखभाल आणि सर्व्हरशी संबंधित गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी अशी पावले उचलतात. याद्वारे बँका आपली यंत्रणा मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करतात. या देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनेही हे पाऊल उचलले आहे.
UPI LITE म्हणजे काय? SBI Digital Services|
हे एक ‘ऑन-डिव्हाइस वॉलेट’ वैशिष्ट्य आहे, जे वापरकर्त्यांना यूपीआय पिन न वापरता रिअल टाइममध्ये लहान रक्कम पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. UPI Lite लहान रकमेच्या व्यवहारांसाठी तयार केले आहे. NPCI वेबसाइटनुसार UPI Lite द्वारे 200 रुपयांपेक्षा कमी पेमेंटसाठी वापरकर्त्यांना यूपीआय पिनची गरज पडत नाही.
हेही वाचा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा,’मला कुणी फसवू शकत नाही. सगळ्या आमदार खासदारांची कुंडली…’