हा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान व्यापार संघटनांनी या निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शासकीय बंगल्याला रायगड असे नाव देण्यात आले आहे. तर जितेंद्र आव्हाड यांचा बंगला शिवगड तर अमित देशमुख यांचा बंगला आता जंजिरा या नावाने ओळखला जाईल.
कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणतं नाव?
अ 3 – शिवगड – जितेंद्र आव्हाड
अ 4 – राजगड – दादा भुसे
अ 5 – प्रतापगड -के.सी. पाडवी
अ 6 – रायगड – आदित्य ठाकरे
अ 9 – लोहगड –
बी 1 – सिंहगड – विजय वड्डेटीवार
बी 2 – रत्नसिंधू – उदय सामंत
बी 3 – जंजिरा – अमित देशमुख
बी 4 – पावनगड – वर्षा गायकवाड
बी 5 – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ
बी 6 – सिद्धगड – यशोमती ठाकूर
बी 7 – पन्हाळगड – सुनील केदार
क 1 – सुवर्णगड – गुलाबराव पाटील
क 2 – ब्रह्मगिरी – संदीपान भुमरे
क 3 – पुरंदर
क 4 – शिवालय
क 5 – अजिंक्यतारा – अनिल परब
क 6 – प्रचितगड – बाळासाहेब पाटील
क 7 – जयगड
क 8 – विशाळगड