शासन निर्णयाची प्रतीक्षा
पुणे – नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 2021-20 या आर्थिक वर्षात पुणे शहरात रेडी रेकनरच्या (जमिनीचे वार्षिक बाजारमूल्य दर) दरात सरासरी 5 टक्के, तर ग्रामीण भागात 2 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी 1 एप्रिल रोजी रेडी रेकनरचे दर नव्याने लागू करण्यात येतात. त्यानुसार मुद्रांक शुल्क विभागाने पुढील आर्थिक वर्षाच्या रेडी रेकनरचे नवे दर प्रस्तावित केले आहे. हे आर्थिक वर्ष करोनाच्या संकटातच गेले.
राज्य शासनाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली. ही सवलत 31 मार्चपर्यंतच आहे. या सवलतीचा लाभ नागरिकांनी घेतला.