सुरत : गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात कारवाई करत तब्बल ६०० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. पोलिसांनी मालिया मियाणामधून १२० किलो ड्रग्ज जप्त केले असून या प्रकरणाचे ‘कनेक्शन’ पाकिस्तानचा ड्रग माफिया खालिद बख्शसोबत आहे. पदार्थ पाकिस्तानमधूनच भारतात पाठवण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. याबाबत पोलीस महासंचालक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
Another achievement of Gujarat Police.
Gujarat Police is leading from the front to eliminate the drugs.
Gujarat ATS has snabbed around 120 kilo drugs.@dgpgujarat will address the press conference on the subject at 11 AM today. @GujaratPolice @himanshu_rewa
— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) November 15, 2021
राज्याचे मंत्री हर्ष सांगवी यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे. गुजरात एटीएसने या प्रकरणी ड्रग्जसोबत ४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी खालिदचा संबंध थेट दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी असल्याचंही समोर येत आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जचे कनेक्शन पाकिस्तानसोबतच दुबईशी देखील असल्याचा आरोप होत आहे. पाकिस्तानचा माफिया खालिदने भारतातील जब्बार आणि गुलाम नावाच्या तस्करांची दुबईतील सोमालिया कँटीनमध्ये भेट घेतली होती, अशीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी या दोन्ही भारतीय तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.
गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. महिनाभर आधी तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रानंतर गुजरातध्येही ड्रग्जचे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.