बिडेन म्हणाले, ट्रम्प खोटारडे !

वॉशिंग्टन – ट्रम्प यांनी केलेले सर्वच दावे खोटे आहेत आणि ते किती खोटारडे आहेत हे मी वेगळे सांगायची गरज नाही, अशी पुष्टी जोडत बिडेन यांनी ट्रम्प यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला.

अशा चर्चेच्यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांचे हस्तांदोलन करण्याची अमेरिकत प्रथा आहे, पण दोघांनीही एकमेकांचे हस्तांदोलन केले नाही. दोघांनीही मास्क घालण्याची दक्षता यावेळी घेतली नव्हती.

ट्रम्प यांनी केवळ 750 डॉलर्स इतकाच कर भरल्याचा बिडेन यांचा आरोपही ट्रम्प यांनी यावेळी धुडकावून लावला. मी लक्षावधी डॉलर्सचा कर आतापर्यंत भरला आहे, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

त्यावेळी मला तुमचे टॅक्‍स रिटर्न दाखवा, असे आव्हान बिडेन यांनी दिले. त्यावेळी माझ्या सर्व टॅक्‍स पावत्या निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहेत आणि ही चर्चा संपल्यानंतर मी तुम्हाला त्या सादर करीन असे ट्रम्प यांनी नमूद केले.

या निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ 35 दिवसच बाकी राहिले असल्याने दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचे वातावरण चांगलेच तापवले आहे. बिडेन जिंकले तर चीन जिंकेल असा दावा करणाऱ्या ट्रम्प यांना बिडेन यांनी ट्रम्प हे रशियाचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.