#IPL2020 : कोलकाताचे राजस्थानसमोर 175 धावांचे आव्हान

Madhuvan

आबूधाबी – सलामीवीर शुभमन गिल आणि इयोन माॅर्गनच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान ठेवले आहे.  राजस्थानचा  कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने क्षेत्ररक्षण स्विकारताना कोलकाता संघास प्रथम फलंदाजीस पाचारणं केलं. त्यानंतर कोलकाताने 20 षटकांत 6 गड्याच्या मोबदल्यात 174 धावा केल्या.

कोलकाताकडून सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 47(34) तर इयोन माॅर्गनने नाबाद 34 (23) धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त आंद्रे रसेलने 24(14), नितीश राणाने 22(17),  सुनील नरेनने 15(14), पॅट कमिन्सने 12(10) आणि कमलेश नागरकोटने नाबाद 8(5) धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिक स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ 1 धाव काढली.

राजस्थान राॅयल्सकडून जोफ्रा आर्चरने 4 षटकात 18 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर अंकित राजपूत, जयदेव उनादकट, टाॅम करन आणि राहुल तेवतियाने प्रत्येकी 1 गडी बाद केला. श्रेयस गोपलची गोलंदाजी महागडी ठरली, त्याने 4 षटकांत सर्वाधिक 43 धावा दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.