इको फ्रेन्डली गणेशमूर्तीसाठी भूमि पेडणेकरचे आवाहन

गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. नेहमी वाजत गाजत साजरा होणारा हा उत्सव यावेळी मात्र अगदी मूकपणे साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव साजरा करण्याचे अन्य इतरही मार्ग आहेत.

सर्वांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी इको फ्रेंडली गणेशमूर्ती घरी आणाव्यात अशी अपेक्षा भूमि पेडणेकरने व्यक्‍त केली आहे. भूमि पेडणेकर एक पर्यावरण प्रेमी कार्यकर्ती देखील आहे. गणेशोत्सव हा आपला आवडता उत्सव आहे. आपण घरी कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आलो आहोत.

मात्र जलवायू संरक्षणाच्या एका दौऱ्यावर निघाली असल्याने भूमिने गणेशोत्सव साजरा करण्याचे अन्य पर्यायही आपल्यासमोर असल्याचे म्हटले आहे. निसर्ग म्हणजेच ईश्‍वर आहे आणि ईश्‍वर हा निसर्ग आहे. मग निसर्ग संवर्धनातून ईश्‍वराची आराधना केली जाऊ शकते, असे तिने म्हटले आहे.

पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींच्या प्रचारासाठी भूमीने महाराष्ट्रातील गणेशमूर्तीकार दत्ताद्री यांच्याबरोबर मिळून एक प्रचार अभियान सुरू केले आहे. दत्ताद्री हे गणेशमूर्तींमध्ये काही वनस्पतींच्या बिया पेरून मगच मूर्ती तयार करतात.

त्यामुळे मूर्ती विसर्जित केल्यावर हे बीज आपोआप रुजून नवीन झाड उगवते. अशा प्रकारे पर्यावरण स्नेही मूर्ती बनवल्या तर भविष्यात गणेशमूर्तींचे प्रदूषण होणार नाही. उलट निसर्ग संवर्धनाला हातभारही लावला जाईल, असे भूमिचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.