जुलै महिन्यात पन्नास लाख नोकऱ्या गेल्या

मुंबई – लॉकडाऊननंतर काही प्रमाणात परिस्थिती सुधारत असली तरी जुलै महिन्यात 50 लाख पगारदारांच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

त्यामुळे करोना व्हायरस आल्यापासून नोकऱ्या गमावलेल्या यांची संख्या 1 कोटी 89 लाख इतकी झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमी त्या संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यात 39 लाख, तर जुलै महिन्यात 50 लाख रोजगारांची निर्मिती झाली. असे समजले जाते की एकूण रोजगार पैकी फक्त 21 टक्के रोजगार हे पगारी आहेत.

या नोकऱ्या शक्‍यतो लवकर कमी होत नाहीत. मात्र, या क्षेत्रातही रोजगाराची हानी होत आहे. एप्रिल महिन्यात 12 कोटी 15 लाख रोजगारावर परिणाम झाला होता. मात्र, हे प्रमाण मे महिन्यामध्ये 10 कोटींवर आले आहे. आता परिस्थिती वेगाने सुधारत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे अनौपचारिक क्षेत्रातील कामकाज बऱ्याच प्रमाणात सुरू होऊ
लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.