दिवसभरात 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
भोर – भोर तालुक्यातील करोनाचा कहर थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. खेड्यापाड्यांपर्यंत करोनाने विळखा घातला आहे. (दि.9) भोर शहर 7, म्हाळवडी 5, भोंगवली 2, माझगांव 2, व भोलावडे येथील 1, अशा 17 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. भोर, नसरापूर व पुणे येथे 76 करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
तालुक्यातील करोनाबाधितांचा आजअखेर आकडा 282 वर पोहोचला आहे. यातील 195 जणांनी करोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर तालुक्यातील 11 जणांचा करोनाने बळी घेतला असून 922 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.