भोर – भातलावणीच्या कामाला वेग आल्याने भात लावणी करताना पारंपरिक भलरीची गाणी भात खाचरात धुमधूमू लागली आहेत, भात लावणी करताना शारीरिक थकवा येतो, अशी कष्टाची कामे करताना थकवा जाणवू नये, श्रमपरिहार व्हावा, लावणी करताना उत्साह वाढावा, एकमेकांना स्फूर्ती मिळावी यासाठी समूहाने गाणी म्हणून थकवा दूर केला जातो या भलरी गीतांचे स्वर ग्रामीण भागातील शेतात,बांधावर ऐकु येतात.
शेताचे काम कंटाळवाणे,निरस होऊ नये,या करीता भलरी गितातून मनोरंजन बरोबर आपल्या आप्तजनांचे,माहेराचे कौतुक केले जाते,लावणी करणा-यात जोश, उत्साह,व विरगुंळा करीता महिला, पुरुष शेतकरी भलर गातात,एक जण गातो त्याला बाकीचे साथ देतात,वेळ कसा जातो, लावणी लवकर होते.
लावणी जपान्या भाताची , जपान्या भाताची
दोरी धरावी कात्याची , कात्याची
पोती भरावी भाताची ,भाताची
टिकली लावावी गंधाची , गंधाची
पाऊस पडतो झिरीमिरी झिरीमिरी
बंधु आपल्या शेतावरी ग शेतावरी
नदी पल्याड तूज गावू ग गावू
बंधु उपाशी नको जावू ग जावू
तुजी बहिण माजी जाऊ ग जाऊ
अशी भलरी गीत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही गाणी सतत हस्तांतरित होतात यमक, ओघवती रचना, लयबध्दता, बोली भाषेत,गितात गोडवा असतो, महिला आवडी गाणी गात शेतीची कामे पुर्ण करतात,हसत खेळत शेतकरी आपली लावणीची कामे करतो., पुर्वी जंगलाचे प्रमाण जास्त होते,जनावर,प्राणी शेतात,परिसरात असेल तर जनावरे पळून जाई.