पुणे – भारत माता की जय… एकच वादा विराट दादा… जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणांनी एफसी रोडवरील गुडलक चौक आसमंत दुमदुमन निघाल्याचे रविवारी दिसून आले. भारतान प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला आणि देशभरामध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. पुण्यातही एफसी रोडवर तरुणाई भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर एकवटल्याचे दिसून आले.
भारतानं पाकिस्तानला पराभवाची धुळ चारल्यानंतर देशभरामध्ये विजयोत्सव साजरा होताना दिसत आहे. भारतीय संघानं दिवाळीचं मोठं गिफ्ट दिल्याची भावना प्रेक्षकांनी, क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केली. पुण्यातील एफसी रोडवर भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाई एकवटली होती. शेकडो तरूनांनी एफसी रोड विविध घोषनांनी दुमदुमला होता. पण आंनद साजरा करताना तरूनाईला वाहतूक कोंडी झाल्याचे भान राहिले नव्हते.
बराचवेळ एफसी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहवयास मिळाले. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. एफसी रोडवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर काही वेळाने एफसी रोडवरील वाहतूक सुरळीत झाली. त्यामुळे कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.