माळेगाव, (वार्ताहर) – पुणे विभागात मोनिका यांची तलाठीपदी निवड झाली आहे. गोल्डन ॲकॅडमीच्या नावलौकिकात आणखी एक भर पडली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे अल्पवधीतच प्रसिद्धीस आलेल्या गोल्डन ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांची वेगवेगळे क्षेत्रात निवड होत असताना मोनिका युवराज येळे यांची पुणे विभागात तलाठीपदी निवड झाल्याने गोल्डन ॲकॅडमी व माळेगाव क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माळेगाव क्रीडा संकुल येथे मोनिका यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माळेगावचे माजी सरपंच दीपक तावरे, गोल्डन ॲकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा. दीपक गावडे, विजय भोसले, ग्रामस्थ व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मला मिळालेल्या पदामध्ये आमचे गुरुवर्य प्रा. दीपक गावडे यांचा मोलाचा वाटा आहे. माझ्या कुटुंबीयांनी मला खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे मी या यशापर्यंत पोहोचू शकले.- मोनिका युवराज येळे, विद्यार्थिनी गोल्डन ॲकॅडमी.
विद्यार्थ्यांना घडवून मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचवणे हाच आमच्या ॲकॅडमीचा उद्देश आहे. – प्रा. दीपक गावडे, गोल्डन ॲकॅडमी प्रमुख.