अमृतसर – पंजाब मधील आम आदमी पक्षाच्या दैदिप्यमान विजयानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी अमृतसर येथे भव्य रोड शो आयोजित केला होता.
हातात तिरंगा आणि पक्षाचे झेंडे घेऊन आपचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने आपच्या वरिष्ठ नेतृत्वाची झलक अनुभवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. रोड शोच्या आधी दोन्ही नेत्यांनी सुवर्ण मंदिर, दुर्गियाना मंदिर आणि जालियनवाला बाग स्मारकाला भेट दिली.
आम्ही पंजाबच्या लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी गुरु साहिबांचे आशीर्वाद घेतले असे मान यांनी सांगितले.16 मार्च रोजी महान स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.आम आदमी पार्टी ने पंजाब निवडणुकीत 92 जागांसह दणदणीत विजय नोंदवला आहे.