Pro-Kabaddi League 2023-24 (Hyderabad) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या लढतीत बंगळुरु बुल्स संघाने तेलगु टायटन्स संघावर ४२-२६ अशी मात केली. या विजयासह बंगळुरु संघाने स्पर्धेतील आगेकूच कायम राखली आहे. बंगळुरु संघाचा अक्षित या विजयाचा शिल्पकार ठरला.
ತೆಲುಗು ಟೈಟನ್ಸ್ ಮಣ್ಣುಮುಕ್ಕಿಸಿದ ಬುಲ್ಸ್ 😍🥳
ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ರೋಚಕ ಗೆಲವು ✌🔥#ProKabaddi #ProKabaddiLeague #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #BENvBLR #BengalWarriors #BengaluruBulls pic.twitter.com/tnh1UsJpB5
— ProKabaddi (@ProKabaddi) January 19, 2024
या सामन्याला प्रारंभ झाला तेव्ह पहिल्या सत्रात तेलगु टायटन्सने आघाडी घेतली व हे सत्र पूर्ण होइपर्यंत ती टीकवली. पहिले सत्र संपले तेव्हा तेलगु संघाने १२-९ अशी ३ गुणांची का होइना पण निसटती आघाडी घेतली. तेलगु संघाच्या पवन शेरावत व प्रवेश भेन्सवाल यांनी जोरदार आक्रमण करत तब्बल ७ टॅकल गुण मिळवून दिले.
या दोन संघात या स्पर्धेच्या इतिहासात आजवर बंगळुरु बुल्सने वर्चस्व राखले आहे. आतापर्यंत या दोन संघात झालेल्या २२ सामन्यांपैकी बंगळुरुने १५ विजय मिळवले आहेत. तर तेलगु संघाने केवळ ३ वेळा विजय प्राप्त केला आहे. ४ सामने बरोबरीत सुटले आहेत.
#PKLSeason10 (#DELvGG Match 76) : दिल्लीविरुद्ध गुजरातची दबंगगिरी; आठव्या विजयाची केली नोंद…
दुसरे सत्र सुरु झाल्यावर बंगळुरुने पिछाडी भरून काढली. तेलगु संघाने पुन्हा एकदा आघाडी घेत बंगळुरुवर दडपण आणले. बंगळुरुने तेलगुविरुद्ध सर्वबादचे गुण मिळवताना सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर बंगळुरुने सामन्याचे चित्रट पालटवले. त्यांच्या सर्वोत्तम रेडर अक्षितने तेलगुविरुद्ध सर्वबादचे महत्वाचे गुण मिळवले व सामना बंगळुरुकडे झुकवला. त्यानंतर तेलगु संघाच्या खेळात आलेला संथपणा बंगळुरूच्या पथ्यावर पडला. दुसरे सत्र संपूर्ण बंगळुरुच्या वर्चस्वाचे ठरले.