पुणे : पुणे – बंगळुरु महामार्गावरील दरी पुलावर आज सायंकाळी एका कारला भीषण आग लागली. घटनेची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून सिंहगड रोड अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.
घटनास्थळी पोहोचताच जवानानी पाहिले असता एक चारचाकी वाहन मोठ्या प्रमाणात पेटले होते. प्रथम जवानांनी या वाहनामधे कोणी अडकले आहे का याची खात्री करुन पाण्याचा मारा सुरू केला व पाच मिनिटात आग आटोक्यात आणली. रेनाॅल्ट कंपनीची कार होती.
पुणे – बंगळुरु महामार्गावर कारला भीषण आग; रेनाॅल्ट कंपनीची कार जळून खाक pic.twitter.com/fvlw7cz29o
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 19, 2024
गाडी मालक हे कोल्हापूरचे रहिवाशी असून पुण्यावरून कोल्हापूरकडे जात असताना वाहनाच्या पुढील बाजूने धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी त्यांनी प्रसंगावधान राखत आपले वाहन रस्याच्या कडेला घेऊन अग्निशमन दलास पाचारण केले. आगीमध्ये वाहन पुर्ण जळाले असून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्रातील वाहनचालक विजय साखरे, तांडेल संतोष भिलारे, जवान तुषार करे, अमर आटोळे यांनी सहभाग घेतला.