Dabang Delhi K.C. vs Gujarat Giants, Pro Kabaddi League 2023-24 (Jaipur) :– प्रो-कबड्डी लीगच्या बुधवारी झालेल्या लढतीत गुजरात जायंट्स संघाने दबंग दिल्ली संघाचा 31-26 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर गुजरात संघाने स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. दबंग दिल्लीला हरवून गुजरात जायंट्सने आपला 8वा विजय नोंदवला.
या सामन्याला प्रारंभ झाल्यावर पहिल्या सत्रातच दिल्लीची दबंगगिरी गुजरातने मोडून काढली. सातत्याने यशस्वी रेड व चढाया करत आवश्यक गुण मिळवले. या सत्रात गुजरातने 19-12 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. गुजरातकडून सोनु सिंगने 5 तर दीपक सिंगने 4 गुण पटकावले. गुजरातने रेडचे 8 तर टॅकलचे 7 गुण मिळवले. त्यांना प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद केल्याचे 2 तर अतिरीक्त बोनस 2 गुणही मिळाले. त्यामुळेच पहिल्या सत्रात गुजारतचेच वर्चस्व राहिले.
दबंग दिल्ली को हराकर गुजरात जायंट्स ने दर्ज की अपनी 8वीं जीत ✌
इस मुकाबले में किस खिलाड़ी ने जीता आपका दिल? 💬#ProKabaddi #ProKabaddiLeague #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #DELvGG #DabangDelhiKC #GujaratGiants pic.twitter.com/0XmM9Ec9cX
— ProKabaddi (@ProKabaddi) January 17, 2024
दिल्लीकडून स्टार खेळाडू अशु मलिकने 6 गुण मिळवताना चांगली लढत दिली. त्यांनी 7 रेडचे तर, 5 टॅकलचे गुण मिळवले मात्र, या दोन्हीत गुजरात जास्त सर ठरल्याने पहिल्या सत्रात त्यांचेच दडपण दिल्लीवर राहिले.
दुसरे सत्र सुरु झाल्यावर दिल्लीने नव्या दमाने खेळ केला व तुल्यबळ लढत दिली. एकवेळ त्यांनी अशू मलिकच्या कामगिरीच्या जोरावर सामन्यात 26-20 अशी रंगतही निर्माण केली होती. तसेच अशुला सुरेख साथ देत आशिशनेही चांगला खेळ केला व एकवेळ 29-25 अशी टशनही निर्माण केली.
#PKLSeason10 (#BENvBLR Match 73) : बंगाल संघाचा ऐतिहासिक विजय, बंगळुरुचा केला पराभव…
मात्र, मोक्याच्या क्षणी सोनु सिंग व दीपक सिंगने संघाची आघाडी वाढवली व गुजरातचा विजय साकार केला. या दोन्ही संघांची रेड गुणांमध्ये 11-11 अशी बरोबरी झाली मात्र, टॅकल गुणांत गुजरातने 12-09 असे वर्चस्व गाजवले व इथेच ते दिल्लीवर भारी पडले व 31-26 अशा फरकासह त्यांनी हा सामनाही जिंकला.