कोलकाता – कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे पश्चिम बंगाल सरकारने राज्यात नव्याने जे निर्बंध लागू केले होते ते त्यांनी काहीं प्रमाणात पुन्हा शिथिल केले आहेत. सलून आणि ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे.
तथापि सलून व ब्युर्टी पार्लर मध्ये कोविड विषयक सर्व दक्षता घेतल्या जाव्यात अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. राज्यातील व्यायामशाळा आणि स्वीमिंग पुलावर घालण्यात आलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले असून ते बंदच राहतील असे सरकारने म्हटले आहे.
राज्यातील शैक्षणिक संस्थाहीं बंदच राहणार आहेत. या राज्यातील विमान वाहतूक काहीं प्रमाणात नियंत्रित करण्यात आली आहे. राज्यात ओमायक्रॉनचे संक्रमण वाढल्याने अन्यही उपाययोजना राज्य सरकारतर्फे केल्या जात असून आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.