लंडन – इंग्लंडमध्ये करोना संसर्गाला आळा घालण्यासाठी घालण्यात आलेले अनेक निर्बंध सरकारने आता उठवले आहेत. या आधीअनिवार्य करण्यात आलेले प्रमाणपत्राचे बंधन आता पुढील गुरुवारपासून रद्द होणार असल्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल संसदेत निवेदन सादर करताना सांगितले.
आता सरकार लोकांना घरून काम करण्याचा आग्रह धरणार नसून नागरिकांनी आता आपल्या कार्यालयात जाऊन काम करण्यासाठी नियोक्त्यांशी त्यासंबंधी बोलावे असेही जॉन्सन यांनी सांगितले. आता सरकारकडून कुठेही मास्कची सक्तीही केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.