बीड – शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड- परळी महामार्गावरील घोडका राजुरी परिसरात हा हल्ला झाला. हल्यात जखमी झालेले जगताप यांच्यावर बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
२ दिवसापूर्वी शिवसेना मंत्री संदीपान भुमरे बीडमध्ये आले असता, त्यांच्यासमोर मी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांसह इतर सत्ताधाऱ्यांविषयी तक्रार केली होती. त्यानंतर मला ही मारहाण करण्यात आली आहे, असे जखमी हनुमान जगताप यांनी म्हटले आहे. राजकीय द्वेषापोटी माझ्या पतीला मारहाण केली आहे, असे जगताप यांच्या पत्नीने म्हंटले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.