पिंपरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८वा वर्धापनदिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी-चिंचवड शहरातर्फे सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली सदर स्पर्धा ३ गटात राजमाता जिजाऊ पर्यटन केंद्र मोरया गोसावी मंदिरा शेजारी चिंचवड येथे घेण्यात आली.
या स्पर्धेत ४७८ स्पर्धकांना सहभाग घेतला. पिंपरी चिचंवड परिसरात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरुपात सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी भाग घेतला.
या स्पर्धेत विजेत्यांना प्रथम क्रमांकास स्मार्ट वॉच व ट्रॉफी देण्यात आली. द्वितीय आणि तृतीय क्रमांकास ट्रॉफी देण्यात आली. १०-१५ वयोगटात प्रथम क्रमांक श्रुती आजित डौले, द्वितीय व तृतीय क्रमांक आर्या राजू जामदार, पारस संदिप जगदाळे. १६ ते २० वयोगटात प्रथम क्रमांक अवंती विनोद देशपांडे, द्वितीय व तृतीय क्रमांक अनिशा अशोक जगदाळे, वैष्णवी दत्तात्रय थोरे. २१ ते खुला गटात प्रथम क्रमांक श्रध्दा ब्रम्हानंद जाधव द्वितीय व तृतीय क्रमांक अमर सर्जेराव वि मोराळे, अशोक मनोहर सोनवणे यांनी पटकावला.
पर्यवेक्षक म्हणून ‘क’ कॅलिग्राफीच्या अर्चना कुंजीर व कांचन निकुंभ ,शिक्षिका स्मिता जोशी, वीणा तांबे, योगिणी शिंदे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजेश अवसरे यांनी केले. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, जनहित सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू भालेराव, जनहितचे शहराध्यक्ष शैलेश पाटील, विधी विभागाच्या शहराध्यक्ष ॲड प्रितीसिंह परदेशी, महिला सेनेच्या उपाध्यक्षा अनिता पांचाळ, वैशाली कोराटे, निशा प्रभु, उप शहराध्यक्ष विशाल मानकरी, भाजप चिटणीस मधुकर बच्चे, डॉ. प्रविण कोठावदे उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, मनविसे शहराध्यक्ष अनिकेत प्रभु यांनी केले. उपशहराध्यक्ष ओंकार पाटोळे, सिध्देश सोनकवडे, प्रतिक शिंदे, तसेच विभाग अध्यक्ष सुमित कलापुरे, शरण्य पाटणे, आकाश खामकर, किरण पाटील, महेश बडगुजर, प्रज्योत पुजारी, रिशीराज उगाले, हर्शल कोळेकर, अजित देवकर, जगदिश लांडगे, आकाश फंड, अनिल घोडेकर, तुषार वराडे, निखिल गावडे, शेखर गांगर्डे, अमोल शिंदे, यश कुदळे, यांनी नियोजन केले.