संगमनेर – किरकोळ कारणामुळे तुफान हाणामारी झाल्याची घटना काल रविवारी रात्री 8:30 च्या सुमारास संगमनेर शहरातील जोर्वे नाका या परिसरात घडली. या हाणामारीत धारदार शस्रांचा वापर केल्याने सहाजण गंभीर जखमी झाले असून शहर पोलिसात याबाबत 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोर्वे गावातील काही तरुण संगमनेर शहरातील आपले काम आटोपून घरी जात असताना पिकअप गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून त्या युवकांना मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलिसांत जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून ते पुन्हा घरी जात असताना, अगोदरच दबा धरून बसलेले 100 ते 150 लोकांनी एकत्र येत हातात तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, चॉपर इत्यादी घेऊन “ये वही लोग है जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन को तक्रार देने गये थे आज इन्हे जिंदा घर नही जाने देंगे” असे म्हणत त्या तरुणांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.
यात सुमित पोपट थोरात (वय 20 वर्षे), तन्मय राजेश दिघे ( वय 18 वर्षे ) विजय मंजाबापू थोरात ( वय 45 वर्षे), अजय भिमाजी थोरात ( वय ४५ वर्षे), जितेंद्र कैलास दिघे (वय 29 वर्ष), रवींद्र नामदेव गाडेकर (वय 31 वर्ष), बाबासाहेब शिवाजी थोरात (वय 35 वर्षे, सर्व राहणार जोर्वे, ता संगमनेर), यांच्यासह एक अल्पवयीन युवक यांच्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत आरोपी बाबू टपरीवाला (पूर्ण पत्ता माहीत नाही), इमरान वडेवाला (पूर्ण पत्ता माहित नाही), नदीम हुसेन शेख, इमरान (युसुफ पेंटरचा मुलगा), रियाज जहीर शेख ( रिक्षावाला ), साफिक (चहावाला), साफिक ( पूर्ण नाव माहित नाही), इरफान (पूर्ण नाव माहित नाही) , अकील (टपरीवाला, पूर्ण नाव माहित नाही), ताहीर नजीर पठाण, शाहिद (वाळूवाला, पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय मुसेफ शेख (पूर्ण नाव माहित नाही), मुज्जू (पूर्ण नाव माहित नाही), फय्युम फिटर (पूर्ण नाव माहित नाही), एफफु खान (वडेवाला), आरफत रफिक शेख, इरफान (वडेवाला, व याच्याकडे काम करणारे तीन जण पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) आणि इतर शंभर ते दीडशे (नाव पत्ता माहीत नसणारे) यांच्यावर कलम 307, 324, 143, 147, 148, 149, आर्म ऍक्ट 4/25 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक निवांत जाधव हे करत आहेत.