मुंबई – अभनेत्री प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींनपैकी एक आहे. सध्या प्रियांका हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. नुकतीच प्रियांका ‘सिटाडेल’ या हॉलिवूड सिरीजमध्ये दिसली. प्रियांकाने ‘अंदाज’ चित्रपटापासून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. नुकतंच प्रियांकाने या चित्रपटातील डान्सबाबतचा एक किस्सा सर्वांसमोर आणला आहे.
प्रियांका तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठीही ओळखली जाते. प्रियंका चोप्राला अंदाज या चित्रपटासाठी डान्स करणे खूप अवघड वाटले. या चित्रपटातील ‘अल्ला करे दिल ना लगे’ हे प्रसिद्ध गाणे शूट करतानाही प्रियांकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.केपटाऊनला या गाण्याचे शूट होणार होते. प्रियांका त्यावेळी नवखी होती. अनेकदा प्रॅक्टिस करूनही तिला स्टेप्स नीट जमत नव्हत्या. अनेक प्रयत्न करूनही चित्रपट निर्मात्यांना हवा तसा डान्स अभिनेत्रींकडून मिळाला नाही. अशात ते मुंबईला परत आले.
मुंबईत पोहोचल्यानंतर सुनील दर्शनने प्रियांकाला नृत्य शिकवण्यासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर वीरू कृष्णनला कामावर घेतले. वीरूने अभिनेत्रीला जवळपास 45 दिवस डान्स शिकवला. यावेळी प्रियांकाने मनापासून मेहनत केली. इतर सर्व गोष्टी सोडून तिने केवळ डान्सवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतरच प्रियांका सुनील दर्शनाच्या इच्छेनुसार डान्स करू शकली. जवळपास दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर, अंदाजची टीम चित्रपटाच्या शूटिंगसाठी केपटाऊनला परतली.
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ट्विंकल खन्ना प्रेग्नंट होती.अक्षय आणि ट्विंकल पहिल्यांदाच आई-वडील होणार होते. अशा परिस्थितीत ट्विंकलच्या प्रसूतीला फारसा वेळ उरला नव्हता. त्यामुळे अशा परिस्थितीत अक्षयने निर्मात्यांना सल्ला दिला की आपण दोन महिन्यांचा ब्रेक घ्यावा आणि त्यानंतर सर्वजण मुंबईला परतले.प्रियांका चोप्राचा अंदाज हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियंका चोप्राशिवाय लारा दत्ता आणि अक्षय कुमार यांच्याही मुख्य भूमिका होत्या.