पुणे – पत्ते खेळण्याच्या कारणातून चौघांनी एकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना लोंढेवस्ती, पाषाण येथे घडली.
याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी समाधान रामू लोंढे (वय 48), करण केशव लोंढे (वय 25), कुंदन केशव लोंढे (वय 22), रोहन समाधान लोंढे (वय 21, सर्व राहणार लोंढे वस्ती) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवेंद्र बाळकृष्ण लोंढे (वय 25, रा. लोंढे वस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरडे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.