सातारा – दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारात दिवाळीची खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. तर अनेक जण आपल्या घरावर रोषणाई कऱण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र त्यातच घरावर रोषणाई करताना एका व्यक्तीला आपल्या प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे घरावर रोषणाई करताना सावधगिरी बाळगावी.
साताऱ्यात दिवाळी निमित्ताने इमारतीला रोषणाई करताना संपूर्ण कुटुंबाला विजेचा शॉक लागून सर्वजण जखमी झाले. या घटनेत कुटुंब प्रमुखाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं घरावर दु:खाचा डोंगार कोसळला आहे. सुनील पवार असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तिचं नाव आहे.
सुनिल पवार इमारतीला लायटिंग लावत होते. त्याचवेळी घात झाला. घरासमोरील एमएससीबीच्या तारेला लायटिंगच्या माळेचा धक्का लागला आणि सुनिल यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचण्याच्या प्रयत्नात असलेली दोन चिमुकली मुल आणि पत्नी गंभीररित्या भाजले आहेत.
सातारा शहरातील मोरे कॉलनीत राहणारे सुनील पवार हे या इमारतीमध्ये भाडेकरु म्हणून राहतात. ते काम धंदा करुन कुटुंब चालवायचे. सुनील यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर पत्नी, आणि दोन मुलांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.