शिरूर – पुणे जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये झाला असून शिरूर तालुक्याचाही समावेश रेड झोनमध्ये असल्याची माहिती शिरूर तहसीलदार लैला शेख यांनी दिली आहे.
शेख म्हणाले की, शिरूर तालुक्यातील सद्यस्थितीत खालील बाबींना प्रतिबंध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बस वाहतूक, सर्व शाळा, कॉलेज, प्रशिक्षण कोचिंग संस्था बंद राहतील.
तथापि ऑनलाइन शिक्षण यात सूट असणार आहे. सर्व सिनेमा हॉल शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायाम शाळा, खेळ संकुले, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, चित्रपटगृह, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल, तत्सम ठिकाण, सर्व सामाजिक, राजकीय, खेळ मनोरंजन, शैक्षणिक सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मेळावे सर्व धार्मिक स्थळे, पूजेची प्रार्थनेची ठिकाणी नागरिकांसाठी बंद राहतील, धार्मिक स्थळावर गर्दी करण्यास मनाई असणार आहे. तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सायकल, रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी सेवा, बससेवा, सलून, स्पा दुकाने या बाबींना प्रतिबंधित करण्यात येत आहे.
लग्नसमारंभासाठी 50 व्यक्तींची मर्यादा असून परवानगी देण्यात येत आहे. त्यासाठी सामाजिक अंतर ठेवले जाईल, अंत्यविधीसारख्या कार्यक्रमास 20 पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होता येणार नाही. सूचनांची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास समित्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 भारतीय सात अधिनियम 897 भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1960) कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा शेख यांनी दिला आहे.